डिझिटल सही- फायदे आणि तोटे

डिझिटल सही म्हणजे काय ?

आपली सही ही व्यावहारिक जगात आपली एक ओळख असते. ह्या सहीच्या माध्यमातून आपण सर्व कायदेशीर, आर्थिक, सामाजिक आणि  शैक्षणिक व्यवहार पूर्ण करतो. काही सन्माननीय आणि प्रतिष्ठीत व्यक्तींसाठी त्यांची सहीही ऑटोग्राफ असते. ह्याच एका भौतिक सहीला इलेक्ट्रॉनिक आणि टेकनॉलॉगीच्या  माध्यमातून रुपांतरीत करून डिझिटल सिग्नेचर (सही ) बनवली जाते. डिझिटल सिग्नेचर (सही)ला  कायदेशीर रित्या संपूर्ण भारतात तसेच इतर देशात  मानत्या प्राप्त झाली आहे. जसे कागाजपत्रावर आपण हस्ताक्षर करतो, त्याच प्रमाणे डिझिटल सिग्नेचर (सही)ने ऑनलाईन कागाजपत्र डिझिटली सही करू शकतो.

डिझिटल सहीचा वापर कुठे आणि कसा होते ?

  1. ऑनलाईन कागजपत्र हस्ताक्षरासाठी डिझिटल सहीचा वापर होतो .
  2. कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) रजिस्टर करताना डिझिटल सहीचा वापर होतो.
  3. ई-विल बनवताना डिझिटल सहीचा वापर होतो.
  4. GST किंवा आयकर (Income Tax ) भरताना डिझिटल सहीचा वापर होतो.
  5. आयात किंवा निर्यात उद्योगात डिझिटल सहीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  6. कस्टम, ई-टेंडर , ई-बिडींग, ई-ऑक्शन मध्ये डिझिटल सहीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  7. ऑनलाईन कायद्याच्या कागजपत्रात , ऑनलाईन मेडिएशन (समझोते ) , ई -अग्रीमेंट , ई – कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिझिटल सहीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  8. ऑनलाईन उद्योग, ई-कॉमर्स , टेकनॉलॉगी सॉफ्टवेअर आणि काही मोबाईल ऍप मध्ये हस्ताक्षरासाठी डिझिटल सहीचा वापर होतो.
  9. प्रत्येक व्यक्ती खाजगी कामांसाठीसुद्धा डिझिटल सही वापरू शकते.
  10. ट्रेड मार्क आणि पेटन्ट रजिस्टर करताना डिझिटल सहीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  11. परदेशात किंवा परदेशी संस्थेसोबत आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहार करताना डिझिटल सही

डिझिटल सहीचे सर्टिफिकेट कोण विकत घेऊ शकते?

  1. वैयक्तिक वापरासाठी कोणीही व्यक्ती
  2. भारतीय कंपनी आणि  संस्था
  3. परदेशी व्यक्ती आणि परदेशी संस्था
  4. IEC कोड होल्डर

डिझिटल सहीचे फायदे :

  1. सहज आणि सुलभ वापर :

    एकदा तुम्ही डिझिटल सही रजिस्टर करून सर्टिफिकेट मिळवले की डिझिटल सहीचा वापर तुम्ही सहज आणि सुलभ पद्धतीने कागजपत्र डिझिटली हस्ताक्षरीत करण्यासाठी करू शकतात. त्यासाठी विशेष ट्रैनिंगची आवश्यकता नाही.

  2. वेळेची बचत :

    वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही, त्यामुळे वेळेचा जपून वापर करणे आवश्यक आहे. डिझिटल सहीच्या माध्यमातून आपण कधीही आणि कुठेही ऑनलाईन कागत हस्ताक्षरीत करून वेळेचा योग्य वापर करू शकतो.

  3. उद्योगात आणि उद्योगाच्या प्रगतीत वाढ :

    कागजपत्रासाठी वाट बघणे किंवा सहीसाठी कुरिअर करणे ,ह्यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि कधी-कधी होणारी कामे, उद्योग समझोते फिसकटतात आणि संधी हातातून निघून जाते. डिझिटल सहीने कोणतीही औद्योगिक कामे आणि त्यासाठी लागणारे कागजपत्रे क्षणात हस्ताक्षरीत करून होतात आणि उद्योगाला नवीन दिशा आणि औद्योगिक प्रगती होते.

  4. . कागदाची बचत :

    दरवर्षी करोडो झाडे कागद निर्मितीसाठी कापली जातात. ऑनलाईन कागजपात्र आणि  डिझिटल सहीमुळे ह्या नैसर्गिक नुकसानात कुठे तरी निर्बंध लागत चालला आहे तसेच  झाडांची आणि कागदाची बचत होत चालली आहेत.

  5. कायद्याचा पाठींबा :

    भारतात आणि इतर काही देशात ऑनलाईन कागजपत्रांना आणि डिझिटल सहीला कायदेशीर मंजुरी तसेच कायद्याचा पाठींबा आहे.

  6. कागजपत्रामध्ये अचूकता:

    बऱ्याच वेळेला कागजपत्राचे प्रमाण जास्त असले की काही कागजपत्रांवर नकळत सही करायची राहून जाते. परंतु डिझिटल सही ही अचूक पद्धत आहे त्यामुळे पूर्ण कागजपत्र अचूक रित्या हस्ताक्षरीत केली जातात.

  7. सहीमध्ये समरूपता :

    कागजपत्राचे प्रमाण जास्त असले, तर सही करून करून कधी-कधी सहीमध्ये बदल होतो किंवा समरूपता निघून जाते. परंतु डिझिटल सही ही अचूक पद्धत आहे, त्यामध्ये  डिझिटल सहीत काहीही बदल होत नाही. एक कागद असो वा एक करोड सर्व कागजपत्रावर एकाच पद्धतीने  डिझिटल सही हस्ताक्षरीत केली जाते.

  8. पैशाची बचत :

    डिझिटल सहीमुळे कागजपात्रांचा खर्च, कुरिअर खर्च, प्रिंटिंग खर्च आणि इतर असे बरेच खर्च वाचतात आणि डिझिटल कागजपत्र, डिझिटल सहीने आरामात हस्ताक्षरीत केली जाते.

  9. ग्राहकांमध्ये वृद्धी :

    तुमचे ग्राहक,  डिझिटल सहीने, डिझिटल कागजपत्र कधीही आणि कुठेही सही करून घेऊ शकतात त्यामुळे ग्राहकांचा वेळही वाचतो आणि कंपनी / उद्योगाविषयी निष्ठाही वाढते.

डिझिटल सहीचे तोटे आणि धोके:

  1. ऑनलाईन कागजपत्र साठवणुकीची अपूर्ण जागा :

    जेव्हा आपण एखादे डिझिटल सहीचे सॉफ्टवेअर घेतो तेव्हा  ऑनलाईन कागजपत्र साठवणुकीची पूर्ण माहिती घ्यावी नाहीतर, काहीच कागजपत्र सही केल्यावर सर्व्हरवर जागेची कामातरता भासू शकते.

  2. सुरक्षित विक्रेता :

    डिझिटल सही सॉफ्टवेअर घेताना मिळणारे फायदे, सेवा, सुरक्षितता आणि सॉफ्टवेअरचे नियम  जाणून घ्या आणि मगच डिझिटल सही सॉफ्टवेअर रजिस्टर करा. बाजारात काही विक्रेते स्वस्तात डिझिटल सही सॉफ्टवेअर सेवा देतात परंतु एकदा पैसे आले की सुरक्षित सेवा देत नाहीत.

  3. ऑनलाईन फसवणूक:

    सध्या सायबर फसवणूक आणि गुन्हे ह्या मध्ये करून तुमच्या  डिझिटल सहीचा वापर करून ऑनलाईन फसवणूक होऊ शकते.

  4. अनाधिकृत हस्ताक्षर :

    काही विक्रेते, उद्योजक किंवा आपलेच कर्माचारी सायबर फसवणूक करून तुमच्या  डिझिटल सहीचा अनाधिकृत हस्ताक्षर करून  फायदा उचलू शकतात तेव्हा सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.

  5. अनुपालन झाल्याचे धोके :

    ऑनलाईन फॉर्म भरताना , डिझिटल सही अपलोड करताना जर व्यत्यय किंवा त्रुटी आली आणि योग्य नमुत केल्या पद्धतीचे अनुपालन झाले नाही तर नुकसान होऊ शकते. 

आजच्या डिझिटल युगात, आधुनिक औद्योगिक आणि व्यावसायिक जगात डिझिटल सिग्नेचर (सही ) ह्याचे एक वेगळेच आणि अद्वितीय स्थान आहे. परंतु साध्या सहीपेक्षा डिझिटल सिग्नेचर (सही)ची विशेष काळजी घ्यावी लागते. डिझिटल सिग्नेचर (सही)चा वापर योग्य ठिकाणी आणि काळजीपूर्वक करावा.

Adv. Shivangi Zarkar

Founder – Law Fleeter Adv Shivangi

https://www.advshivangi.com

एम एस एम ई समाधान आणि फायदे

आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,

Recent Posts

Subscribe to our Newsletter

Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!

Copyright © 2024 Vakilinbai

Managed by Web Creators India