आपल्या देशात शेकडो बँक आहेत आणि त्या बँकांच्या आर्थिक व्यवहारातील सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे चेक. उद्योग क्षेत्रातील दैनंदिन व्यवहारात चेक नेहमीच महतवाची भूमिका बजावतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या पेमेंट बद्दल सुरक्षितता हवी असेल तर आगाऊ पेमेंट बद्दल चेक घेतला जातो. दैनंदिन जीवनात कोणी शाळेची/ महाविद्यालयाची फीज चेक ने भरतो तर काही लोक कर्जाचे हफ्ते चेकने भरतात….. एखाद्याला उधारीवर ( क्रेडिट) माल वा वस्तू हव्या असतील तर उरलेल्या पेमेंटची सुरक्षितता म्हणून देखील चेकचा वापर केला जातो.
चेक हा नेगोशिएबलं इंस्ट्रुमेन्ट ऍक्ट मध्ये येतो त्यामुळे त्याला एक प्रकारचे बिल ऑफ एक्सचेज मानले जाते. समोरच्याला चेक देताना एकतर क्रॉस किंवा अकाउंट पेयी करून दिला जातो. बऱ्याच वेळेला चेक दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर बाउन्स होतो किंवा डिसऑनर होतो किंवा केला जातो. चेक बाउन्स किंवा डिसऑनर होण्याची बरीच कारण असतात, कधी कधी चेक दिल्या नंतर पेमेंट बद्दल लोकांना लक्ष्यात रहात नाही आणि अकाउंट मध्ये योग्य ती रक्कम नसल्यामुळे चेक बाउन्स होतो. परंतु काही लोक समोरच्याला फसवण्याच्या दृष्टीने चेक देतात आणि नंतर पैश्याच्या अभावी चेक बाउन्स होतो.
जेव्हा चेक बाउन्स किंवा डिसऑनर होतो तेव्हा बँक एक चेक रिटर्न मेमो तयार करते, ज्या मध्ये पेमेंट न केल्याची संपूर्ण माहिती असते. नंतर ज्याच्या नावाचा चेक होता (चेक होल्डर ) आणि जो डिसऑनर झाला तो डिसऑनर चेक आणि चेक रिटर्न मेमो त्या व्यक्तीला देते. चेक होल्डर , तीन महिन्यामध्ये तो चेक पुन्हा बँकमध्ये पेमेंटसाठी टाकू शकतो जेणे करून दुसऱ्यांदा तरी चेक वाटला जाईल. परंतु जर पुन्हा चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर चेक होल्डरला पुंर्ण स्वातंत्र आहे की तो त्याच्या पैश्यासाठी समोरच्यावर कायदेशीर कारवाई करेल
जेव्हा चेक होल्डरला दिला गेलेला चेक हा आर्थिक व्यवहारासाठी , कर्जाचे हफ्ते म्हणून असेल. परंतु जर बेकायदेशीर प्रकारे जर हा चेक फसवून घेतला असेल तर त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही.
चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाल्यावर तो बाउन्स किंवा डिसऑनर चेक आणि चेक रिटर्न मेमो बॅंकेतून ३० दिवसाच्या आत घेऊन यावा.
त्यानंतर वकिलाच्या मदतीने १५ दिवसाच्या आत समोरच्या पक्ष्याला ( चेक देणाऱ्याला ) लीगल नोटीस पाठवावी आणि त्यात थकलेल्या पेमेंटला ३० दिवसात परत करण्याची मुदत द्यावी.
नोटीसचा वेळ संपायच्या आत ही तक्रार दंडाधिकारी न्यायालयात नोंदवली गेली पाहिजे.
जर चेक देणाऱ्याने येणाऱ्या नोटीस मिळाल्यावर येणाऱ्या १५ दिवसात पेमेंट नाही केले तर गोशिएबल इंस्ट्रुमेन्ट ऍक्टच्या कलम १३८ प्रमाणे कारवाई केली जाईल.
चेक बाउन्स किंवा डिसऑनर मध्ये जर चेक देणारा गुन्हेगार असेल तर जेवढ्या रकमेचा चेक आहे त्याच्या दुप्पट रक्कम किंवा दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. चेक बाउन्स किंवा डिसऑनर करणाऱ्याचे चेक बुक थांबवले जाते.
पैश्याच्या वसूली साठी चेक धारक दिवाणी न्यायालयात खटला (केस) दाखल करू शकतो.
जर उद्योगात कोणी उधारीवर माल मागत असेल तर तुम्ही पैश्याची सुरक्षा म्हणून समोरच्या व्यक्ती कडून चेक घेऊन आपके पेमेंट सुरक्षित करू शकतात. ९०% केसेस लीगल नोटीस मिळण्यानंतर पेमेंट केली जातात. आजच्या धकाधकीच्या काळात पैश्याची सुरक्षा ही सर्वात मोठी जवाबदारी आहे म्हणून चेकी बाउन्स किंवा डिसऑनरला फौजदारी खटल्यात पकडले जाते आणि कठोर शिक्षा ठोकावली जाते .
चेक बाउन्स किंवा डिसऑनर का अक्षम्य गुन्हा आहे त्यामुळे चेक देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने चेक बाउन्स किंवा डिसऑनर होऊन पैश्याचा व्यवहार बिघडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. सर्व नियमांचे योग्य पालन करावे. चेक हे एक व्यवहारातील पैश्याच्या सुरक्षेतेचे साधन आहे , तो बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर कडक कारवाई होते आणि फार कमी वेळात न्याय मिळतो. म्हणून चुकीच्या व्यक्तीं कडून चेक घेणे टाळा. जिथे शाश्वात आहे तिथेच चेक घ्या किंवा द्या.
ऍड. शिवांगी झरकर
Founder – Law Fleeter Adv. Shivangi
www.advshivangi.com
आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,
May 18, 2024
May 18, 2024
May 18, 2024
Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!
We Fight For Your Right…
May 18, 2024
May 18, 2024
Copyright © 2024 Vakilinbai
Managed by Web Creators India
WhatsApp us