बचत गट - काळाची नवी गरज आणि तुमची आमची नविन ओळख

‘ काळाची गरज मी,

स्वप्नांपूर्तीची संधी मी,

मी आहे तुमच्या व्यक्तीमत्वाचा विकास आणि दुःखांचा शेवट,

मी आहे तुमचा बचत गट !!!….!

माणूस मोठा होतो तसेच त्याची स्वप्ने पण मोठी होतात. माणूस कितीही मोठा झाला तरीही संचयनाचा मूळ स्वभाव त्याचा कमी होत नाही किंवा जात नाही. किंबहुना हा स्वभाव वयाप्रमाणे वा हुद्या प्रमाणे वाढत जातो. आजच्या कमाईमधून थोडे थोडे बाजूला ठेवून संचयन करणे हा मानवधर्म आहे. नोकरदार वर्ग आणि उद्योजक वर्ग, हे संचयन बँक, सहकारी संस्था, जागा ह्या स्वरुपात करत असतात. महिला वर्ग मुख्यतः संचयन दागदागिन्यांच्य स्वरुपात करतात. आज केलीली बचत किंवा संचयन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते आणि त्यावरच आपल्याला आपले समाजातील स्थान आणि ओळख मिळते. संचयन आणि संघठण ह्या गुणांना एकत्र करुन निर्माण झाला एक आगळा वेगळा पर्व,’ बचत गट’.

भारतात स्वातंत्रानंतर उद्योनांना बरीच गती मिळाली आणि बरेच व्यवसाय, उद्योगधंदे आणि कारखाने उभे रहीले. त्याच प्रमाणे भारतात काही ठिकाणी संचयन आणि सहकार ह्या गुणांवर मोठ्याप्रमाणात स्थापन झाल्या सहकारी संस्था. पण कारखानदारी आणि सहकारी संस्था ह्यांच्या सोबात भारताला गरज आहे स्वंयरोजगार आणि सुक्ष्म उद्योगांच्या विकासाची. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यानी आधी पासून प्राधान्य दिले स्वंयरोजगार आणि सुक्ष्म उद्योगांना.’ गाव सुधारले की देश सुधारतो’ ह्या भावनेने गांधीजींनी उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर जास्त भर दिला होता आणि खादी सारखी संस्था उदयास आली. भारतातील आर्थिक आणि सामाजिक गरजा लक्ष्यात घेऊन, तसेच सुक्ष्म उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने बचत गटांची निर्मिती केली. बचत गट हे पहिले पाऊल आहे औद्योगीकरणाचे. गावागावंत आज बचत गट लाखोंच्य संखेत निर्माण झाले आहेत आणि होत आहेत. बचत गट म्हणजे काय? कसे निर्माण होतो हे

खाली बघुया…..

बचत गट म्हणजे काय?

बचत गट म्हणजे नक्की काय हे बऱ्याच लोकांना माहित नसतो. एकत्रीकरणाचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे’ बचत गट’.’ एकसे भले दो और दो से भले तीन’ किंवा’ एक और एक ग्यारहा’ अशी बरीच हिन्दी काव्य आणि गाणी आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकली आहेत पण वास्तवीतेशी ह्या गाण्यांचा किती संबंध आहे किंवा ह्या गाण्यांचा गुढ अर्थ जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न सुधा नाही केला. बचत गट हाच गुढ अर्थ दर्शवितो आणि उद्योगधंद्यात अनुभव देतो.

बचत गट = संचयन + एकत्रीकरण सामूहिक अध्ययन + एकसंघ विचार + स्वप्नांसाठी घेतलेली एकत्रित झेप

बचत गट का निर्माण होतो?

स्वप्नांना कोणतेही बंधन नसते, पण वास्तवाचा निखारा स्वप्नांच्या पंखांना जाळून टाकतो. त्यामध्येच प्रामुख्याने लोक स्वतः ही ओळख आणि स्वतः स्वतःबद्दल बघीतलेली स्वप्न विसरुन जातात. इच्छा असुन व्यवसाय किं वा उद्योग सुरु करु शकत नाहीत. अपूरे भांडवल आणि क्षीण झालेल्या आत्मविसावामुळे स्वयंरोजगार किंवा सुक्ष्म उद्योगाचे स्वप्न स्वप्नांतच राहते. मला व्यवसाय जमेल का?” मी घर संभाळून व्यवसाय कसा करू?” नोकरी सोबात कोणता जोडधंदा मला योग्य?’ असे बरेच प्रश्न आपल्या पैकी बऱ्याच लोकांना पडतात आणि रात्री उशी सोबत झोपून जातात. ह्या सर्व प्रश्नांवरचे उत्तर म्हणजे बचत गट.

बचत गटात तुम्ही एकटे नसतात आणि सामूहिक दुष्ट्‌या तुम्ही कोणताही उपक्रम

कराता. जर तुम्हांला उद्योग सुरु करायचा असेल तर भांडवल लागते आणि भाडवल अभावी उद्योग सुरु होत नाही. पण बचत गट हा उपक्रमच मूळात आपल्या बचत रक्कमेवर आहे. बचत गट निर्माण होतो बचत किंवा संचित झालेल्या रक्कमेवर.

बचत गट बनतो कमीत कमी 10 लोकांनी, मग ते 10 पुरुष असो वा 10 महिला. 10 लोक एकत्र येतात आणि एक बचत गट निर्माण करतात. बचत गटातील प्रत्येक दरमहा काही ठरावीक रक्कम बचत करतो आणि बचत गटात भविष्यातील उपक्रम किंवा व्यवसायांसाठी संचित करतो. दर महा संचित केलेली रक्कम कितीही असू शकते. अश्या प्रकारे बचत गटाची प्राथमिक सुरुवात होते. बचत गटात बचत करण्या मागे प्रत्येक सदस्याचा वाटा हा खारीचा असतो. जर उद्योगाचाअ सेतु बांधायचा असेल तर प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे अनिवार्य आहे. बचत गटांतील आज संचित केलेली सुक्ष्म बचत रक्कम सुध्दा उद्याच्या विकासाचे आणि उद्योगधंद्याच्या निर्मितीचे भांडवल ठरते.

बचत गट निर्मिती मागच्या गरजा किंवा बचत गटांची वैशिष्ट्ये कोणती?

  1. सामूहिक समस्या / परिस्थिती / गरज :

    एका विशिष्ट भागात, प्रभागात काही समान नैसर्गिक / भौगोलिक आणि आर्थिक परिस्थीती असते किंवा निर्माण होते. त्यामुळे त्या प्रदेशात एकसारखे उद्योगधंदे निर्माण होतात. उदा. सोलापुर मध्ये चादरीचा व्यवसाय, घाटांत जंगलात मघाचा व्यवसाय. जेव्हा एक सारखी स्थिती एखाद्या भागात असते तेव्हा त्यावर पूरक उद्योक निर्मितीसाठी बचत गट निर्माण होतो आणि कधी कधी संपूर्ण गांव अश्या प्रकल्पात सहभागी होतो.

  2.  देवाणघेवाण

    कधी कधी गांवा गावांत आंतरीक आणि बाह्य गरजा भागवण्यासाठी वस्तूंची देवाणघेवाण होते आणि काही बचत गट ह्या देवाणघेवणची कामे करतात.

  3. गट सातत्यता

    बचत गटांमध्ये एकता रहावी, सातत्यता कायम रहवी, एकजूटीने कामे मार्गी लागावी ह्या साठी पण बचत गट निर्माण होतात.

  4.  स्वायत्तता

    बचत गट ह्यांच्या माध्यमातून निर्माण होणारे उद्योग किंवा उपक्रम ह्या वर कोणा दुसऱ्याची मत्तेदारी नसते. बचत गट ह्यांची स्वायत्तता असते.

प्रायोगीक शिक्षण आणि जाणीव बचत गटांच्या माध्यमातून विविध शिक्षण आणि प्रशिक्षणांचा लाभ घेता येतो.

बचत गट निर्मितीसाठी लागणारी प्रार्थमिक मूल्येः

1. वैयक्तिक जवाबदारी

बचत गट निर्माण करताना किंवा निर्माण झाल्यावर, बचत गटांतील प्रत्येक सदस्याची बचत गटाविषयी समान वैयक्तिक जवाबदारी असते. प्रत्येक सदस्याने त्याच्या उपलब्धी आणि कुवतीप्रमाणे समान रित्या जवाबदारी वाटून घ्यावी. प्रत्येक सदस्यांमध्ये काहितरी गुणं किंवा हुशारी असतात त्यांच्या मदतीने बचत गटांतील समस्या सोडवता आल्या तर सर्व प्रश्न किंवा समस्यांचे निर्मूलन होते. अशी भावना बचत गटातील प्रत्येक व्यक्तीची / सदस्याची असवी.

2. विश्वास

बचत गट निर्माण झाल्यावर काही जाणकार व्यक्ती गटाचे नेतृत्व करतात, अश्यावेळी बाकीच्या सदस्यांचा आपसांत विश्वास असावा. संपूर्ण बचत गटही संकल्पना विश्वासावर उभी आहे. परस्पर विश्वास आणि प्रामाणिकपणा बचत गटाला वेगाने प्रगतीशील करतो. अप्रामाणिकपणा आणि विश्वासघात हा बचत गटाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

3. दुसऱ्याविषयी काळजी
दुसऱ्याविषयी काळजी हा परस्परांविषयीच्या अतूट नात्याचा आणि संबंधाचा संकेत आहे. दुसऱ्याविषयी काळजी बचत गटांत विश्वास निर्माण करते आणि गटाला अभेद्य बनवते.

4. परस्परांविषयी असलेला आदर

परस्परांविषयी असलेला आदर बचत गटांत समतोल आणि सामंजस्य निर्माण करते. गटातील सदस्या एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि प्रयत्नांचा आदर करु लागतात. त्यामुळे विविध कल्प्नांना आणि विचारांना वाव मिळतो तसेच विचारांची आणि कल्पनांची देवणघेवाण होते.

बचत गटांतील गुणः

1. 10 ते 12 लोक एकत्र येवून सुरु केलेली संस्था / उचललेले पाऊल / चळवळ. 2. सहकारी तत्वावर आधारीत आणि ‘एकमेकांस सहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत ह्या विचारसरणीची संस्था.

3. महिला सक्षमिकरणामागचे महत्वाचे पाऊल

4. ग्रामिण भागांतील महिलां आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैय देण्यामागील चळ्वळ

5. सामाजिक समतोल आणि एकात्मतेस पोषक

6. स्वप्नांना उंच भरारी देण्याचे माध्याम

बचत गटांतील दोषः

1. सदस्यांतील पदासाठी होणारे वाद

2. सदस्यांमधील परस्पर अप्रामाणिकपणा आणि अविश्वास

3. राजकिय फायद्यासाठी होणारा वापर

4. माहितीच्या अभावे शासकिय योजनांचा पुरेपूर फायदा न मिळणे
5. आर्थिक संस्थांचे असहकाराचे धोरण

बचत गटांसाठी लागणाऱ्या प्रार्थमिक बाबी / वाटचाल :

1. स्वतःसाठी काहीतरी करण्याची भावना 2. एकत्रपणे एकसंघ होऊन काम करण्याचा ध्यास

3. कमीत कमी 10 लोक एकत्र येऊन बचत गटनिर्माण करणे

4. मासिक शुक्ल / रक्कम ठरवून घेणे आणि दर महिन्याला न चुकता बचत गटांत बचत रक्कम

भरपे

5. मासिक गोष्टींचा संपूर्ण आरखडा बनवणे

6. दरमहा एकदा सर्व सदस्यांची भेट किंवा सभा ठेवणे

7. प्रत्येकाच्या प्रश्नांचे किंवा समस्यांचे समाधान करणे

8. भविष्यातील उद्योगधंद्याविषयीचे मार्गदर्शन आणि माहिती मिळवणे

बचत गटाच्या विकासाचे प्रमुख टप्पेः

1. बचत गटाविषयी काळजी

2. योग्य वर्तन (नमता आणि नियमांचे पालन)

3. भूतकाळातील उदाहरणांवर मिळालेले धडे

4. योग्य नेतृत्वाची निवड

5. संरक्षणात्मक भावना

6. संघर्ष

7. प्रबोधन

8. परिपक्वता

“स्वप्न माझे इवलेसे, दोन्ही बाहूं सामावते,

देऊन उभारी आत्मियतेला, दहाही दिशांत किर्ती गाजवते,

मिळून साथ एकमेकांची, झेप माझी उभारते,
उद्योगसेतु बांधताना, बचत गटाची मैत्री माझी वाढवते ! ….”

Adv. Shivangi Zarkar

एम एस एम ई समाधान आणि फायदे

आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,

Recent Posts

Subscribe to our Newsletter

Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!

Copyright © 2024 Vakilinbai

Managed by Web Creators India