बिझिनेस स्टार्ट अप - उद्योगाची खरी सुरुवात आणि प्रगतीची नविन वाट

‘उद्योगरथाला लागते अश्वमेघाच्या भरधाव अश्वाची साथ, आणि उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागतात एक कल्पना आणि योग्य उद्योग सुरुवात….’

दिवसा मागून रात्र आणि रात्री मागून दिवस येणे हा जरी नित्यक्रम असला तरीही वर्षातील 365 दिवस कोणालाही कधीही समान नसतात. प्रत्येक दिवशी, प्रत्येकाच्या मनात असंख्य आणि भनांट कल्पना झेप घेत असतात, हा विचार घेवून जरी हिशोब केला, तरीही आपल्या जिवनात प्रत्येक वर्षी कमीत कमी 365 नविन कल्पना येवून जातात, याचा अर्थ आपण वार्षिक कमीत कमी 365 कल्पना मनात आणतो आणि व्यर्थ घालवतो. जर बिझनेस करायचा, तर बिझनेस स्टार्ट अप साठी लागते अशीच एखादी आगळी वेगळी कल्पना आणि खंबीर सुरुवात. त्यात आजचे युग आहे संघणक (कॉप्यूटर) आणि मोबाईलचे !…. निसर्गाने आणि टेक्नॉलॉगीने आज बिझनेस करणे अगदी सोप्पे केले आहे. परंतु आपण मात्र अडकतो योग्य कल्पानेचा विचार करुन पहिले पाऊल उचलायला.

                        माझ्या महिला मैत्रिणींना तर मला विशेष एक गोष्टीची आठवण करुन द्यायची आहे, ती म्हणजे, आपण महिला लहानपणापासून कौटुंबिक व्यवहार, घर खर्च, बचत ह्या सर्व गोष्टी डोळस पणे बघत असतो, हाताळात असतो …. तरीही उद्योगाचे पहिले पाऊल घेताना का कचरतो? उलट आपल्या महिलांसाठी उद्योग हा घर आणि कुटुंबाहून वेगळा नाही. जर आपण उद्योगाला कुटुंब आणि घर समझले, तर आपल्या रगतीच्या वाटा कोणीही अडवू शकत नाही. कारण जी स्त्री उत्तम रित्या घर चालवू शकते, ती कोणताही उद्योग संभाळू शकते.

म्हणून,

                                              ‘उचला एक पाऊल उन्नतीचे, प्रगतीचे आणि उद्योगाचे !…..’

बिझिनेस स्टार्ट अप म्हणजे नक्की काय?                                                                                                  विझिनेस स्टार्ट अप म्हणजे नेमके काय ? असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी सतावत असतो. त्याचे उत्तर अगदी सोप्पे आहे, कोणत्याही उद्योगाच्या सुरुवातीला विझनेस स्टार्ट अप म्हणतात. उद्योगाच्या सुरुवातीचे, बिझिनेस स्टार्ट अप मध्ये दोन अर्थ आहेत, एक आपण आपल्या उद्योगाची केलेली सुरुवात आणि दुसरा अर्थ म्हणजे आपण त्या उद्योगाच्या कल्पनेची केलेली सुरुवात आणि त्यातून सुरु केलेला उद्योग, परंतु दाँही प्रकारात उद्योगाची सुरुवात ही महत्वाची आहे.

बिझिनेस स्टार्ट अप यशस्वी रित्या साकारण्याची सप्तपदीः                                                                                  जसे लग्नामध्ये सात फेरे, सात वचन आणि सात पावले म्हणजे सप्तपदी असतात, त्याच प्रमाणे उद्योगात सुद्धा सप्तपदी म्हणजे सात महत्वाची पावले असतात. एक एक योग्य पाऊल योग्यरित्या उचलत आपण आपला उद्योग योग्य मार्गाने सुरु करु शकतो आणि उत्तम रित्या चालवू शकतो. महिला उद्योजिकेंसाठी विशेषतः बिझिनेस स्टार्ट अप -सप्तपदी नेहमीच मैत्रिण म्हणून काम करेल. चला मग पाहूया बिझिनेस स्टार्ट अप सप्तपदी !……

बिझिनेस स्टार्ट अप- सप्तपदी !…….

  1. पहिले पाऊल उद्योग कल्पनेचा योग्य विचारः

    उद्योगाची कल्पना ही नेहमी आगळी वेगळी आणि इतरांहून नेहमी वेगळी असवी. जरा आपण मार्केट मध्ये जगाहून काहीतरी वेगळे दिले, तर नक्कीच उद्योग वृध्दीसाठी लागणारा काळ आणि श्रम वाचू शकतात. त्याच प्रमाणे उद्योग आणि उद्योगाची कल्पना शक्यतो आपल्या छंद, आवडी कुवत आणि कौश्यल्याशी निगडीत असावी.

    उद्योग कल्पना = (अद्वितीय उदगामी छंद कुवत कौशल्य) कल्पना

  2. दुसरे पाऊल उद्योगाचे नियोजन :

    प्रत्येक उद्योगाची सुरुवात करण्याआधी त्या उद्योगाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. उद्योग म्हंटला की यश सोबत अपयश आणि जिंकण्या सोबत हरणे आले. म्हणून उद्योगाचे योग्य नियोजन असले तर होणारा त्रास कमी होतो किंबहुना होत नाही.

    उद्योग नियोजनासाठी खालील बाबींची आवश्यकता असते-

    * उद्योगाची गरज आणि त्याचे उद्देश

    * उद्योगाचा वास्तवादीपणा

    * उद्योगाचा विशिष्टपणा

    * उद्योगातील जवाबदारी

    * उद्योगाची समझ

    * उद्योगासंबधी विचार विनीमय

    * उद्योगासंबधी बांधिलकी

    * उद्योगाचा पाठपुरावा आणि नियोजनाचे सातत्य

  3. तिसरे पाऊल उद्योगातील स्त्रोत :                                                                                                         जर प्रती वर्ष आपण सरासरी कढली तर आपल्याला समझेल की जेवढे उद्योग सुरु होतात त्यढून कितीतरी उद्योग बंद होतात. ह्याचे मुख्य कारण आहे उद्योग स्त्रोतांचे ढासळलेला समतोल. कोणत्याही उद्योगाची सुरुवात करताना आपल्या कडे असलेले स्त्रोत मूलभूत जाणून घ्यावेत आणि उद्योगाला संभाव्या लागणारे स्त्रोतांची आणि त्यासाठी लागण्याच्या भांडवलीची कल्पना काढून घ्यावी.                                                                                                                                                                                                                                   उद्योगातील स्त्रोत खालील प्रमाणेः

    * मूलभूत स्त्रोत

    * आर्थिक स्त्रोत

    * मानव स्त्रोत

    * शैक्षणिक स्त्रोत

    * भौतिक स्त्रोत

    * भावनिक स्त्रोत

  4. चौथे पाऊल मार्केटींग आणि ब्रेडींगः                                                                                              स्वतःच्या उद्योगाचे मार्केटिंग आणि ब्रेडींग केल्या शिवाय उद्योगाच्या यशाला पायरी मिळत नाही. उदा. हापूस कोकणांत सर्वत्र पिकतो, पण देवगड हापूसला सर्वात जास्त मागणे आहे. कारण देवगड हापूस हा एक ब्रँड झाला आहे. तसेच आपण आपल्या उत्पादनाचा, उद्योगाचा एक आगळा वेगळा ब्रँड निर्माण करु शकतो. एकदा बॅड सर्वत्र नावाजला की उद्योग सुध्दा उंच झेप घेतो. बँड निर्माण झाला की मार्केटिंग करपे सोईस्कर होऊन जाते. म्हणून हे चौथे पाऊल अतीशय महत्वाचे आहे.                                                                                                                                                                                                                                                ब्रेडिंग साठी खालील गोष्टीसाठी करतातः

    * लोगो किंवा चिन्ह / चित्र बँडींग

    * उत्पादनाच्या वैशिष्ट / गुणधर्माचे वॅडींग

    * कंपनीच्या / उत्पादनाच्या नावाचे ब्रेडींग

    * बैंड व्यक्तिमत्वः नामवंत व्यक्ती सोबत / मार्फत आपल्या उत्पादनाचे बॅडींग

    * कंपनीच्या / उत्पादनाच्या टॅगलाईनचे बॅडींग

  5. पाचवे पाऊल अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन
    अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन हा उद्योगाचा कणा आहे. जर अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन बिघडले तर मोठ्यातील मोठा उद्योग बंद पडू शकतो.त्यामुळे अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन सर्वात अधिक महत्व दिले आहे. अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन मध्ये खाते लेखन (अकांऊटिंग), हिशोब (बुक किपिंग) आणि कर आकारणी (टॅक्सेशन) ह्या बाबींचा समावेश होतो.                                                                                                                                                             अर्थ व्यवस्थापन आणि नियोजनाची प्रकिया खालील प्रमाणेः

    * पहिली पायरीः उद्योगाच्या आर्थिक स्थानाचे विश्लेषण

    * दुसरी पायरीः आर्थिक नियोजनाच्या विकासाची योजना आखणी

    * तिसरी पायरीः आर्थिक नियोजनाच्या विकासाची योजनेची अंमलबजावणी

    * चौथी पायरीः आर्थिक नियोजनाच्या विकासाची योजनेची देखरेख

  6. सहावे पाऊल उद्योग देखभालीची यादी निर्मिती
    आपला उद्योग योग्य दिशेला आणि योग्य पध्दतीने सुरु आहे की नाही किंवा उद्योगात काही अडथळे किंवा संकटे येण्याच्या संभावना आहेत का? अश्या सर्व गोष्टींची यादी करणे आवश्यक असते. कारण आपण आधी पासून जर तयार असू, तर मग कितीही अडथळे किंवा संकटे आली तरी आपण जोमाने त्याला सामोरे जाऊ शकतो, त्याप्रमाणे आपण आपल्या यशाच्या पायऱ्या ठरवू शकतो.
    उद्योग देखभालीची यादी निर्मिती साठी लागणाऱ्या बाबीः

    * डू लिस्टः जे करायचे आहे त्या सर्व गोष्टींची यादी

    * रेकॉर्ड ट्रेकिंगः पूर्वीच्या सर्व महत्वाच्या गोष्टींची नोंदणी

  7. सातवे पाऊल उद्योगाची ध्येय निर्मिती आणि लक्ष्य साधणे                                                                      ज्या उद्देशांसाठी किंवा ज्या ध्येयांना साधण्यासाठी उद्योग निर्माण केला, त्याच्या पुर्ततेच्या दिशेचे हे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निर्मिती आणि लक्ष्य साधणे. उद्योगासाठी भविष्यात ध्येय निर्मिती आणि लक्ष्य साधणे महत्वाचे असते, त्या शिवाय उद्योगाला गती मिळत नाही म्हणून प्रत्येक उद्योजक आणि उद्योजिकेने त्यांचे भविष्यातील ध्येय आणि लक्ष्य निर्मिती करुन ठेवावी.                                                                                                                   उद्योगात भविष्यातील ध्येय निर्मिती आणि लक्ष्य साधण्यासाठी खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्याः

    * ध्येय आणि लक्ष्य प्रत्येक विभागात विभागून द्यावेत

    * प्रत्येक विभागाचा ध्येयपुर्तीचा अहवाल मागून घ्यावा आणि तपासावा

    * उद्योगात सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधावा

    उद्योगात भविष्यातील ध्येय निमिती:

    * पहिली पायरीः विशिष्ट ध्येय ठरवणे

    * दुसरी पायरी ध्येय लिहून ठेवणे

    * तिसरी पायरीः ध्येयपुर्तीच्या गरजेचे विश्लेषण करणे

    * चौथी पायरी ध्येयपुर्तीच्या उद्देशांची यादी करणे

    * पाचवी पायरीः ध्येयपुर्तीची कृती योजना निर्मिती करणे

    * सहावी पायरीः ध्येयावावत वचनबध्द राहणे

    * सातवी पायरीः सर्वांशी ध्येयाबाबत बोलणे

    * आठवी पायरीः ध्येयपुर्ती साठी योग्य मुदत देणे

    * नववी पायरी : ध्येयपुर्ती नंतर योग्य मोबदला देणे

    * दहावी पायरी: नविन ध्येय निर्मिती

    बिझिनेस स्टार्ट अप सप्तपदी !…… ही एक उद्योजक आणि विशेषतः महिल उद्योजिकांसाठी उद्योग सुरु करण्याआधीची गुरुकिल्ली आहे. जे उद्योजक किंवा उद्योजिका ही सातही पावलांचे व्यवस्थित शास्त्रोक्त पध्दतीने अनुसरण करतात त्यांना त्यांच्या उद्योगात कमी संकटांना तोंड द्यावे लागते आणि हमखास यश मिळते.
                                                                                                                                                        बिझिनेस स्टार्ट अप सप्तपदी अॅक्शन प्लॅनः

          उद्योगाचे वैयक्तिक मूल्यमापन                                                                                                                              उद्योगाचे विश्लेषण                                                                                                                                              कायदेशीर स्थान                                                                                                                                                  उद्योगाची नोयोजन योजना                                                                                                                                       भांडवल निर्मिती                                                                                                                                                   उद्योगाची स्थापना                                                                                     

                                                         उद्योगाचे परिक्षण आणि तृटी

‘उद्योगाची राणी भी, उद्योग झाली माझी ओळख, कल्पनेच्या दिव्याने, कल्पकतेच्या तेजाने, घालवेन उद्योगातील गरजांचा काळोख, उद्योगाची प्रत्येक पायरी देते आहे मजला, यशाची नवी चाहूल, भरदाव सुटून आता थांबणे शक्यही नाही मला, टाकत पुढचे पाऊल. उद्योगाचा करते प्रारंभ मी किंवा उद्योगात अडला कधी, तर घाबरु नका, आहे हजर मी, तुमची आपली बिझिनेस स्टार्ट अप सप्तपदी !……’

 

Adv. Shivangi Zarkar

एम एस एम ई समाधान आणि फायदे

आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,

Recent Posts

Subscribe to our Newsletter

Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!

Copyright © 2024 Vakilinbai

Managed by Web Creators India