” शरीर-मनाचा समतोल करतो मनुष्याला रुपवान, आणि बिझिनेस फेशीयल किट बनवते उद्योजकाला धनवान व प्रगतीवान !…”
बिझिनेस फेशीयल म्हणजे नक्की काय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलाच असणार, परंतु बिझिनेस फेशीयल बद्दल माहिती घेण्याच्या आगोदर थोडा आढावा घेऊ मागील लेखाचा’ बिझिनेस स्टार्ट अप- सप्तपदी’. मागील अंकात’ बिझिनेस स्टार्ट अप सप्तपदी’ चा वापर करुन विझिनेस सुरु करण्याची आणि वाढवण्याची सात पाऊले आपण बधीतली, पण सुरु केलेल्या उद्योगात सहजता सहज येत नाही, त्या वेळी उपयोग होतो बिझिनेस फेशीयलचा.
बिझिनेस फेशीयल म्हणजे नक्की काय ? ते आता समझून घेऊ. माझ्या महिला उद्योगिनीना फेशियल म्हणजे काय हे तर नक्कीच माहित आहे. त्याच फेशियल च्या पध्दतीला अपनवून आम्ही शोधले आहे बिझिनेस फेशीयल- A Complete Business Cleansing Process’. बहुतांशी महिला सौंदर्यासाठी किंवा सुंदर त्वचेसाठी फेशीयल करुन घेतात, त्यामुळे बाह्य त्वचेवरील मृत त्वचा नाहिशी होते आणि चेहरा चमकदार व तरुण मोहक दिसतो. ह्या पध्दतीच्या अनुसंगाने आपण विझिनेस फेशीयलच्या कार्य पध्दतीची आखणी केली आहे. ज्याचा उपयोग करुन आपण नको असलेले आणि अडथळे निर्माण करणारे घटक काढून टाकतो, तसेच उद्योगाला जास्त प्रगतीवान आणि कार्यक्षम करु शकतो. चला मग बघुया’ बिझिनेस फेशीयल’.
बिझिनेस फेशीयल कार्य पध्दती :
आपण आपला उद्योग, बिझिनेस फेशीयल ह्या पध्दतीने विविध टप्प्यांत विभागून घेतो, जेणे करुन प्रत्येक टप्पा उद्योगात नविन चैतज्ञ निर्माण करु शकते.
बिझिनेस फेशीयल कार्य पध्दतीचे महत्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे…
i) बिझिनेस क्लेझिंग
ii) बिझिनेस स्क्रबिंग
iii) बिझिनेस स्मुदिंग
iv) बिझिनेस टोनिंग
v) बिझिनेस रिलॅक्सिंग
vi) बिझिनेस क्लोनिंग
vii) बिझिनेस मेक ओवर
ⅰ) बिझिनेस क्लॅझिंगः
क्लेंझरचा अर्थच होतो नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे. त्याच प्रमाणे उद्योगात जमा झालेल्या काही अनावश्यक गोष्टी काढण्यासाठी बिझिनेस क्लॅझिंग ह्या टप्प्याचा उपयोग होतो. बिझिनेस फेशीयल मधील ही सर्व प्रथम आणि मूलभूत पायरी आहे. उद्योगाची सुरुवात करताना आपण प्रमाणाच्या बाहेर साधनांचा उपयोग करतोच त्याच प्रमाणे आपण काही अनावश्यक गोष्टी सुध्दा जोपासतो. त्यामुळे उद्योगाची सुरुवात झाली तरी नेमक्या कोणत्या साधनांचा उपयोग होतो आहे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे समझून येत नाही आणि उद्योगातील गुंता वाढतो, त्यासाठी बिझिनेस क्लॅझिंग ह्या कार्यप्रणालीचा उपयोग करावा.
बिझिनेस क्लॅझिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* प्रमाणा बाहेर विजेचा, टेलिफोनचा, कागदाचा, स्टेशनरीचा वापर टाळावा.
* उद्योगाला हवी असलेलीच प्रमाण पत्रे काढावी, ज्या कागजपत्रांची आवश्यकता भविष्यात लागणार आहेत त्यांच्या मागे वेळ आणि पैसा सध्या खर्च करु नये.
* जोपर्यंत उद्योगास गती मिलत नाही तो पर्यंत कामगारांची संख्या मर्यादीत ठेवावी, शक्यतो स्वतः सर्व कामाची माहिती ठेवावी आणि देखरेख ठेवावी.
* इलेक्टोनीक मेडियाचा आपर करुन वेळ आणि पैसा वाचवावा
* ज्या गोष्टींनी उद्योगास नुकसान पोहोचते त्या गोष्टी उद्योगापासून दुर ठेवाव्यात.
* अनावश्यक साधनांचा संचय टाळावा.
ii) बिझिनेस स्क्रबिंगः
स्क्रबिंग म्हणजे खरडून काढणे. जसे एखाद्या खडबडीत गोष्टीला गुळगुळीत करण्यासाठी त्याहून खरखरीत पदार्थाने घासल्यास वस्तूचा खडबडीतपणा कमी होतो आणि वस्तूला गुळगुळीतपणा प्राप्त होतो, त्याचप्रमाणे उद्योगाचे असते. उद्योग सुरु झाला तरी नियमितता आणि सातत्य येण्यासाठी मागील येणारे अडथळे दुर करणे गरजेचे असते. त्यासाठी बिझिनेस स्क्रबिंग टप्प्याचा उपयोग होतो. उद्योगाच्या मार्गात सुरुवातीपासून शाररिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक असे बरेच अडथळे असतात, ज्यामुळे आपल्या प्रगतीपथावरील आपल्या अजिंक्य रथाचा वेग मंदावतो आणि ध्येयपूर्ती धावणे सोडून आपण तिथल्या तिथेच रेंगाळत बसतो. पण बिझिनेस स्क्रबिंग च्या माध्यमातून आपण हे अडथळे दुर करु शकतो.
बिझिनेस स्क्रबिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* शाररिक अडथळे : संतुलित आणि नियमित आहार आणि योग्य व्यायामाच्या सहाय्याने आपले शरीर निरोगी राहू शकते, म्हणून स्वतःला ह्या दो न्ही गोष्टींची सवय लावा व उद्योग आणि शरीराचा समतोल राखा. शरीरातील दोष व्यायाम, आहार ह्या स्क्रबरने काढून टाका, कारण निरोगी शरीर निरोगी उद्योगाला जन्म देते.
* मानसिक अडथळे उद्योग सुरु झाला की ताण-तणाव हा पाहुणा, शरिरावर ठाण मांडून बसतो. ज्याचा सर्वस्वी परिणाम उद्योगावर होतो. ज्याची मानसिक शक्ती सशक्त, तोच उद्योगाच्या क्षेत्रात प्रगती करु शकतो. दुसऱ्याचे मन जिंकण्या साठी स्वतःच्या मनावर ताबा असणे आवश्यक आहे. म्हणून तर लोक बोलतात ना,’ मन जिंकेल, तो जग जिंकेल’. त्यामुळे चंचल न होता उद्योगावर लक्ष केंद्रित करा आणि मानसिक शक्ती वाढवा. बिझिनेस स्क्रबिंग च्या माध्यमातून नको असलेल्या सवयी, व्यसने, स्वभाव स्क्रबिंग करुन काढून टाका, म्हणजे मन निर्मळ आणि स्वच्छ होऊन विचार करेल.
* भावनिक अडथळे : भावनिक अडथळे शक्यतो कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून येतात. त्यामुळे नुसताच सुरु झालेल्या उद्योगाचा वेग मंदावतो. म्हणून भावनिक अडथळे दुर ठेवण्यासाठी उद्योग आणि वैयक्तिक जीवन वेगळे ठेवावे. ज्या नात्यांचा तुमच्या करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि जीवनावर परिणाम होत असेल अशी नाती काही काळापुरता दुर ठेवावी आणि एकचित्त होऊन उद्योगाचा विचार करावा. स्क्रबिंग करुन नको असलेली नाती दुर करावी.
* आर्थिक अडथळे : उद्योग म्हंटला की अर्थव्यवस्था आली आणि अर्थव्यवस्था सुरळित सुरु ठेवण्यासाठी योग्य नियोजन आणि शिस्तबध्दता हवी. नफा आणि नुकसान एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नफा कमवण्यासाठी आर्थिक अडथळे आणि अडवर्णिवर मात करणे आवश्यक आहे. म्हणून स्क्रबिंग करुन आर्थिक समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टी काढून टाका आणि स्वतःला व कर्मचाऱ्यांना एक लयबध्द नियोजन आणि शिस्तीची सवय लावा.
* समाजिक अडथळे समाजिक अडथळे सर्वात जास्त उद्योगास नुकसान पोहोचवतात म्हणून समाज्यात ज्या गोष्टींनी नुकसान होईल अश्या गोष्टी, व्यक्ती उद्योगाशी जोडू नका. समाजात नेहमी आपली आणि आपल्या उद्योगाची प्रतिमा स्वच्छ व निर्मळ ठेवा.
* वैचारीक अडथळे वैचारीक अडथळे स्वतःच्या आणि इतरांच्या विचारातून उदभवतात. ज्या उद्योगाने आनंद आणि संतुष्टी मिळेल असे उद्योग निवडा. विचार दुषित करणाऱ्या व्यक्ती आणि गोष्टी दूर ठेवा. सकारात्मक विचार आपल्याला प्रगती पथावर नेते.
iii) बिझिनेस स्मुर्दिगः
अडचणी व अडथळे उद्योगातून दुर झाल्यावर बिझिनेस स्मुदिंग ह्या टप्प्याकडे वळावे. उद्योगातील कठोरपणा, कडवटपणा तसेच संकटांचा खरखरीतपणा कमी झाला की उद्योगाच्या गालावर गुळगुळीतपणाचा मुलामा देणे गरजेचे आहे. लक्ष्यात ठेवा, गाडीपण नेहमी डोंगराळ भागात जोरात नाही चालत, तिथे तिचा वेग कमी असतो. त्याचप्रमाणे महामार्गावर गाडी रस्त्याच्या गुळगुळीतपणामुळे भरधाव पळते, तसेच आहे उद्योगाचे. उद्योगात प्रगती करायची असेल तर आधी बिझिनेस क्लेझिंग आणि बिझिनेस स्क्रबिंग करुन नको असलेले घटक काढून टाकावे आणि उद्योगपथाला गुळगुळीत आणि सपाट करुन घ्यावे. उद्योग सरळ आणि संकटमुक्त राहण्यासाठी उद्योगाला स्थैर्य प्राप्त करुन देणे गरजेचे आहे.
बिझिनेस स्मुदिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* बिझिनेस स्मुदिंग साठी पैशाचे व वेळेचे नियोजन चोख ठेवावे.
* आपल्या उद्योगासाठी एक वेळ ठरवून घ्या.
* उद्योगात आणि स्वतःमध्ये नेहमी सकारात्मक बदल करावे.
* स्वतःला नेहमी अपडेटेड ठेवावे.
* नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन वेळेची बचत करावी.
* सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
* कर्ज काढल्यास त्याचे हप्ते सुरळित भरावे.
* स्वतःला व उद्योगाला मांडायला शिकावे.
* स्वतःचा आत्मविश्वास नेहमी वाढता ठेवावा.
* स्वतःमध्ये व उद्योगात नेहमी सकारात्मक बदल घडवावे.
iv) बिझिनेस टोर्निगः
उद्योग सुरळित झाला की प्रगती करण्यासाठी नफ्याचे प्रमाण वाढले पाहिजे आणि तोट्याचे प्रमाण घटले पाहिजे. तरच उद्योगाचा समतोल राहू शकतो. जसे शरीराची शक्ती वाढण्यासाठी आपण आहरा सोबत जिवसत्त्वाच्या गोळ्या औषधे आणि शक्तीप्रेरके घेतो त्याच प्रमाणे उद्योगाचा दर्जा वाढवण्यासाठी उद्योगाला टोन्ड करणे म्हणजे सशक्तीकरणाची गरज असते, तेव्हा बिझिनेस टोनिंग हा टप्पा कामी येतो. उद्योग सशक्त झाला की नफा तोट्याच्या चक्रातून निघून तो चढाईला लागतो. चढण म्हटले तर जादा मेहनत आणि शक्ती हवीच!.
बिझिनेस टोनिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* बिझिनेस टोनिंगसाठी खर्च आटोक्यात आणणे गरजेचे असते, तरचं बिझिनेस प्रगतीच्या चढाईला लागतो. अश्याप्रकारे उद्योगांत वाढ करावी.
* अतिरिक्त काम बाहेर आऊट सोर्स करावे.
* उद्योगात नविन प्रोजेक्टसाठी बिझिनेस नेटवर्किंग करावे
* उद्योगात अष्टपैलू हो ऊन काम करावे.
* उद्योगात सशक्तीकरण हवे असेल तर भागीदार आणि गुंतवणूकदार वाढवावे.
* ध्येय नेहमी मोठी ठेवावी, आणि कामात सातत्यता आणावी.
* उद्योगाचे अवलोकन ही महत्वाची बाब आहे.
* भविष्याचा विचार करुन उद्योगात वाढ करावी.
* उद्योग वृध्दीसाठी मदत घ्यावी आणी इतरांना करावी जेणेकरुन आपले उद्योग मित्र परिवार वाढेल.
* उद्योगाचा पाया आणि तत्वे मजबूत ठेवावी, नाहीतर उद्योग कोलमडून पडतो.
v) बिझिनेस रिलेक्सिंगःउद्योग घोडदौड एका हद्दीपर्यंत वाढते, तो पर्यंत जितके होईल तितके उद्योगास वाढवावे. परंतु एका ठरावीक वेळेनंतर उद्योग स्थिरतेकडे आणि ब्रेक इवन पॉईंट कडे जातो, म्हणजे त्याची वाढ थांबते. ह्या टप्प्याला बिझिनेस रिलॅक्सिंग म्हणतात. ह्यावेळेस उद्योजकाने स्थिर राहून नुकसान न होण्याची काळजी घ्यावी.
बिझिनेस रिलॅक्सिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* एक उद्योगातून नविन उद्योगाच्या कल्पनांचा विचार करावा
* उद्योगाची स्थिरता आणि शांती समतोल ठेवावी.
* उद्योगासोबत सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टीत सहभागी हो ऊन, उद्योगाचे बँडिंग करावे.
* उद्योगाची लयबध्दता सतत कार्यरत ठेवावी.
vi) बिझिनेस क्लोनिंग :
उद्योग स्थिर आणि सुरळित सुरु राहिला की मग विझिनेस क्लोनिंगचा विचार करावा. बिझिनेस क्लोनिंग म्हणजे एका मुख्य उद्योगाशी निगडीत असंख्य लघु उद्योगांची स्थापना. जेणे करुन बिझिनेस क्लोनिंग माध्यमातून उद्योगांना लागणारी गुंतवणूक णूक, माध्यम, कच्चामाल ह्या मूलभूत गरजा कमी होतात. बिझिनेस क्लोनिंग ने एक छत्राखाली असंख्य उद्योग निर्माण होतात आणि त्यांच्या प्रगतीसाठी लागणारा वेळ आणि गुंतवणूक कमी होते.
बिझिनेस क्लोनिंग करण्याच्या टिपा / सुचनाः
* मूळ उद्योगाला स्थिर ठेवून त्यावर अवलंबून असणारे जोड उद्योग सुरु करावे. • जोड उद्योग असे असावे की उद्योगातील मूलभूत गोष्टीचा खर्च कमी होईल.
* उद्योग एखाद्या राज्यासारखा वाढवावा आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित करावी.
* जोड उद्योग मूळ उद्योगाचा बॅड वाढवणारा असावा.
vii) बिझिनेस मेक ओवर
काळाप्रमाणे फॅशन, स्टाईल, चव अदा बदलले. मार्केटमध्ये नविन ह्या शब्दाला आणि गोष्टींना अतीशय महत्व आहे. त्यामुळे काळाप्रमाणे उद्योगात, उद्योग पध्दतीत, तंत्रज्ञानात बदल हवेत. काळाप्रमाणे उद्योगात लवचिकता हवी. ह्या सकारात्मक बदलाला विझिनेस मेक ओवर म्हणतात.
बिझिनेस मेक ओवर करण्याच्या टिपा / सुचनाः
* उद्योग नेहमी नविन प्रयोधन करणारा हवा.
इतरांपेक्ष्या काही नाविण्यपूर्ण गोष्टी देणारा उद्योग असावा.
चाकोरी बाहेर विचारसरणी निर्माण करावी आणि धारण करावी.
* बदल नेहमी सकरात्मक असावे.
* वेळ आणि पैसा वाचवण्याचा प्रयत्न करावा.
उद्योगातील अडथळे दुर दुर होतात आणि सुरळितपणा वाढतो.
उद्योगात लयबध्दपणा आणि शिस्त निर्माण होते.
उद्योगात नियोजन आणि संतुलन वाढते.
उद्योगात स्थैर्य निर्माण होते.
उद्योगांच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींशी जोडणी होते.
मूळ उद्योगांना जोड / लघु उद्योगांचा पाठिंवा मिळतो.उद्योगाचा एक बैंड निर्माण होतो.
उद्योग चालवणे आणि गाडी चालवणे ह्या दोघांमध्ये जास्त अंतर नाही. गाडी सारखे क्लिंनिंग,वॉशिंग, कलरींग उद्योगाला पण लागते. जसे आपली गाडी आपण नेहमी स्वच्छ ठेवतो त्यामुळे गाडीचा वेग समतोल आणि समांतर राहतो त्याच प्रमाणे विझिनेस फेशिअलने उद्योगाची गती वाढते आणि उद्योग संकटमुक्त राहू शकतो. मग आजच करुन घ्या बिझिनेस फेशिअल ……..
“स्वच्छ उद्योग, निर्मळ उद्योग हाच बिझिनेस क्लॅझिंगचा ध्यास, उद्योगातील अडथळ्यांना दूर करुन, देते संकटांना बिझिनेस स्क्रबिंगने मात,
प्रगतीचा बुस्टर डोस देऊन, बिझिनेस टोनिंगची पकडली कास, बिझिनेस रिलॅक्सिंगच्या माध्यमातून पकडते सामजिक बदलाचा हात, बिझिनेस कोनिंगने देते असंख्य जोड उद्योगांना साथ, बिझिनेस फेशिअल करुन तर घ्या, होईल बिझिनेस मेक ओवरच्या तारुण्याला सुरुवात !!….”
Adv. Shivangi Zarkar
आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,
May 18, 2024
May 18, 2024
May 18, 2024
Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!
We Fight For Your Right…
May 18, 2024
May 18, 2024
Copyright © 2024 Vakilinbai
Managed by Web Creators India
WhatsApp us