जेव्हा संपूर्ण भारतात विशेषतः महराष्ट्र ,दिल्ली आणि इतर, कोविड १९ ने थैमान मांडले आहे, आणि पुन्हा आपण मागील वर्षाप्रमाणे लॉक डाउनच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत, तेव्हा एकच प्रश्न सतावतो आहे , Whats Next ? कॉन्ट्रॅक्टवर असलेले उद्योग ज्यात ह्या छोट्या SMEs मोठया कंपनीवर अवलंबून असतात, लॉक डाउन मुळे त्यांची तर पळताभुई थोडी झाली आहे, आणि उद्योग, व्यापार ह्याचे परीणाम अगदी जवळून बघत आहेत. अश्या ह्या बिकट परिस्थितीत तुमचा स्टार्ट-अप कसा सुरक्षित रहाणार?
आज हजारो मॅनेजमेन्ट आणि इंजिनीअरिंगची होतकरू मुले देशात स्टार्ट-अप सुरु करु इच्छितात. काही जणांनी तर स्वतः कडचे भांडवल जुळवून स्टार्ट-अप सुरुही करतात, परंतु सध्याच्या बिकट परिस्थितीत त्यांच्या स्टार्ट-अपचा तरी निभाव कसा लागणार. आज ना उद्या सरकारी फंड स्टार्ट-अपला मिळेल , कोणी इन्व्हेस्टर VC फंड देईल अश्या वेड्या आशांनी त्यांची स्वप्न रात्री जागवतात, तरुण पिढी स्वतः:च्या हुशारीला, ज्ञानाला, शिक्षणाला एका सुंदर अश्या कल्पनेत/ योजनेत रोवते, एका लहान बाळाप्रमाणे संभाळते, त्याला जगासमोर आणते आणि अशी काही फसवणूक होते, की स्टार्ट-अप कल्पना एका झटक्यात चोरी होते किंवा तुमच्याच एखाद्या मित्र / पार्टनरमुळे विकली जाते आणि हाती लाभते निराशा आणि फसवणूक.
कोविड १९ मुळे जे उद्योग-धंद्यावर परिणाम झाले आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त फटका हा स्टार्ट-अप उद्योगांना बसला आहे. उद्योजक तोच जो संकटात सुद्धा काही ना काही उद्योग करत राहतो … लढत राहतो परंतु ह्या त्याच्या लढाईत आपल्याच माणसांकडून घातपात झाला, तर आधीच कायद्याच्या सुरक्षितेचे ब्रम्हास्त्र तयार करून ठेवायचे की नाही, हे तुम्हीचं ठरवायला हवे.
आज खरंच तुम्हांला वाटते की आपला उद्योग सुरक्षित रहावा, सर्व आर्थिक आणि औद्योगिक संकटांवर मात करावी आणि तुमचा सर्वांगीण विकास व्हावा तर त्या उद्योगाला कायद्याचे कवच-कुंडल हवे …. अश्या ह्या नवजात स्टार्ट-अपला सुद्धा कायद्याच्या लसीकरणाची गरज आहे. आज वेळ आहे त्याला सुरक्षित करण्याची. त्यासाठी जाणून ह्या काही महत्वाची अग्रीमेंटआणि कागजपत्रे . ह्या गोष्टी तुम्हांला येणाऱ्या शंभर संकटांपासून दूर ठेवतात आणि तुमचा उद्योग चिरकाळ टिकू शकतो … वाढू शकतो….
कारण : को-फाऊंडर अग्रीमेंटमुळे सर्व उद्योजकांच्या भूमिका, जवाबदाऱ्या स्पष्ट राहतात, पारदर्शकता वाढते आणि वाद कमी होतात.
कारण : कधी कधी तुमचा स्टाफ/ एम्प्लॉयी हा तुमची गुप्त माहिती तुमच्या स्पर्धकाला देऊ शकतो किंवा तुमचा प्रतिस्पर्धी बनू शकतो.
कारण : नॉन-डिस्क्लोझर अग्रीमेंट तुमची उद्योग कल्पना आणि योजना, नकल आणि चोरी करणाऱ्यांपासून सुरक्षित ठेवते.
कारण : विविध कर, लायसेन्स, सरकारी नियम, कायदे यांची माहिती असणे आवश्यक आहे.
कायदा : गुंतवणूवकदाराला त्याच्या इन्व्हेस्टमेंटची संपूर्ण कायदेशीर माहिती असते आणि त्याची फसवणूक होत नाही.
कारण : तुमचे स्टार्ट-अप अससोसिएट हे अग्रीमेंटमुळे कायदेशीररित्या तुमच्याशी बांधले जातात आणि दिलेली कामे चोख रित्या ठरलेल्या पैश्यात पार पडतात.
कारण : ट्रेडमार्क किंवा कॉपी राईट जर रजिस्टर नसतील तर उद्योगाचा लोगो, नाव आणि माहितीची चोरी होऊ शकते.
कारण : स्टार्ट-अप कंपनीची प्राईवेट पोलिसी रेजिस्टर असेल तर तुमची गुप्त माहिती, उद्योग रचना चोरीला जाऊ शकत नाही आणि क्लाईंट, फ्रँचायझी आणि इतर लोकांचा त्रास कमी होतो.
कारण : ग्राहक कायदे, सायबर कायदे अतिशय कडक झाल्यामुळे ऑनलाईन व्यवसाय, पैश्याचा व्यवहार करताना सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे.
कारण : त्यामुळे कर्ज आणि गुंतवणूक मिळणे सोपे जाते.
वरील सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरे तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुमचा स्टार्ट-अप कायदेशीर रित्या सुरक्षित आणि विकासाच्या दृष्टीने सक्षम आहे. तुमचा उद्योग सुरक्षित आणि समृद्ध रहावा, आणि प्रगती होत जावी ह्यासाठी वरील सर्व कागजपत्र तयार करावी … कारण खबरदारी नेहमीच भारी !…
-Adv. Shivangi Zarkar
Founder – Law Fleeter Adv Shivangi
आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,
May 18, 2024
May 18, 2024
May 18, 2024
Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!
We Fight For Your Right…
May 18, 2024
May 18, 2024
Copyright © 2024 Vakilinbai
Managed by Web Creators India
WhatsApp us