मित्र-मैत्रिणीनो,,
उद्द्योग जर एक वाहन आहे तर उद्द्योग चालवण्यासाठी किंवा चालत ठेवण्यासाठी मार्केटिंग व सेल्स हे त्या वाहनात लागणारे इंधन आहे. माझ्या बऱ्याचश्या मित्र-मैत्रीणीना उद्योग हवा असतो वा सुरु करायचा असतो पण सर्वात मोठी गोष्ट आडवी येते ती म्हणजे मार्केटिंग व सेल्स. मार्केटिंग व सेल्स, हे दोन्ही नसेल, तर उद्योगाचे बारा वाजतात.
मोठ-मोठ्या कंपनी मध्ये मार्केटिंग व सेल्सचे नियोजन करण्यासाठी, तसेच उद्योगातील मार्केटिंग म्हणजेच विपणन वृद्धी साठी धोरणे आखली जातात. परंतु एका सामान्य उद्योजकाला है मार्केटिंग व सेल्स चे काम तसेच त्या अनुषंगाने येणारी अव्हाहने आणि त्या बद्दलची आखणी व धोरणे स्वतःच करावी लागतात आणि प्रश्न सुद्धा स्वतःच सोडवावे लागतात.
आपल्याला उद्योग मार्केटिंगमध्ये येणारी आव्हाहनेः
नाविण्यातेची कमी
पीडक्त किंवा सर्विसेसची आवश्यकता निर्माण करण्याची कमी
योग्य पद्धतीच्या मार्केटिंगची कमी
एन एन पी मार्केटिंग व सेल्स म्हणजे काय?
एन एल पी म्हणजे आपल्या मनाच्या किंवा मेंदूच्या माध्यामातून आपल्या वर्तनात, स्वभावात आणि सवयीत बदल करणे. आता एन एल पी मार्केटिंग व सेल्स म्हणजे नक्की काय? तर एन एल पी मार्केटिंग व सेल्स म्हणजे आपल्या मनाचे न मेंदूचे मार्केटिंग व सेल्स साठी केले जाणारे प्रोग्रामिंग ज्याच्या मदतीने आपण स्वतःमध्ये, आपल्या उद्द्योगात आणि मार्केटिंग व सेल्स बदल करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्राहकाला आवश्यकतेप्रमाणे प्रोडक्त किंवा सर्विसेसचा पुरवठा करू शकतो.
एन एन पी मार्केटिंग व सेल्स च्या माध्यमातून उद्योग कसा वाढतो?
एन एल पी – मार्केटिंग व सेल्स च्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकाची मानसिकता ओळखू शकतो त्याचप्रमाणे
त्यांची आवश्यकता शोधू शकतो. आणि जर आपल्याला आवश्यकता समझली तर त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे
प्रोडक्त किंवा सर्विसेसचा पुरवठा करू शकतो. एन एल पी मार्केटिंग व सेल्सचा दुसरा फायदा म्हणजे आपण
स्वतःची, उद्द्योगाची तसेच आपल्या कर्मचाऱ्यांची व ग्राहकांची योग्य रित्या काळजी घेऊ शकतो आणि योग्य
सकारात्मक बदल घडवू शकतो.
एन एल पी मार्केटिंग व सेल्सच्या टिप्सः
कसा करावा Rapport ?
अगदी सोप्पे आहे । समोरच्याच्या हाव भावाला मिळते जुळते हावभाव आणणे. त्यात आपल्या चेहऱ्याचे हावभाव विशेष करून येतात.
ह्या गोष्टी टाळाव्याः
१. अनेक तंत्रांचा उपयोग
२. अनेक मार्केटिंग व सेल्स च्या तंत्राचा वापर
३. स्वतःचे मानसिक स्वास्थ खराब करून घेणे
४. हजार प्रोडक्त किंवा सर्विसेस ची माहिती ग्राहकाला एकाच वेळेला देणे
५. बळजबरी करून ओर्डर घेण्याचा प्रयत्न करणे.
२० दिवसांचा प्लान :-
– १-७ दिवस स्वतः ही आरश्याच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करणे, जेणे करून आपली बोलण्याची भीड चेपेल. त्याच प्रमाणे आपले संभाशन सुधारते.
२८-१५ दिवस – घरच्यांशी आणि मित्र परिवाराशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणे,
-१६-20 दिवस – जुन्या ग्राहकांशी पुन्हा जुदन्याचा प्रयत्न त्याच प्रमाणे त्यांच्या आढावा घेणे
-२२ – पुढे दररोज स्वाहाला सकारात्म विचारांचा खुराक द्या
२१ दिवस जर आपण सातत्याने पाठ पुरावा करू तर नक्कीच यश आपल्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल.
Adv. Shivangi Zarkar
आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,
May 18, 2024
May 18, 2024
May 18, 2024
Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!
We Fight For Your Right…
May 18, 2024
May 18, 2024
Copyright © 2024 Vakilinbai
Managed by Web Creators India
WhatsApp us