ई-कॉमर्स व्यवसाय आणि फसवणूक :

गेल्या वर्षी, २०२०ला , कोवीड १९ नावाचा  बॉम्ब अच्यानक आपल्या देशावर कोसळला  आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला भेगा जाऊन,  त्याचे परिणाम आपल्या सर्वांनां भोगावे लागले. अश्या ह्या लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत, ई-कॉमर्स व्यवसायाने मात्र मोबाइल अँप्स स्टार्ट-अप व्यवसायाला मात्र गती दिली आणि दुप्पट वेगाने ह्या व्यवसायाने वाढ केली .  वेबसाईट , मोबाईल अँप अश्या अनेक मार्गांनी हा व्यवसाय घरा घरात पोहोचला. लॉकडाऊन मध्ये संचार बंदी असल्यामुळे आजचा तरुण वर्ग ह्या ई-कॉमर्स व्यवसायत जास्त रुची घेऊ लागला. किती तरी होतकरू व्यावसायिकांनी ह्या उद्योगात स्वतःचे करिअर सुरु केले. आणि  बघता बघता हा व्यवसाय चिमुकल्या मुलांच्या ऑनलाईन लर्निंग पासून आई-वडिलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. परंतु ज्या ई-कॉमर्स वेबसाईट किंबहुना मोबाईल अँप्स वरून तुम्ही ऑर्डर करता किंवा व्हेंडर बनून व्यवसाय करता, तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे का ?

गेल्या वर्षी जरी कोवीड १९ ने थैमान मांडले असले, तरी गुन्हेगारी मात्र संपुष्टात आली नाही. ऑनलाईन गुन्हे (सायबर क्राईम ), ग्राहक तक्रार, व्हाईट कॉलर क्राईम ह्यांसारख्या तक्रारी आणि गुन्हे तिप्पट प्रमाणात नोंदवले गेले. ह्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत आणि तक्रारीत मोठे माध्यम आहे इंटरनेट आणि वेबसाइट / मोबाइल अँप. बऱ्याच वेळेला ‘ऑफर’ नावाच्या मोहाला बळी पडून ऑनलाईन प्रॉडक्ट किंवा सर्विस खरेदी करतो परंतु ती खरेदी करताना ई-कॉमर्स वेबसाईट / मोबाईल अँप्स कंपनी, त्यांचे ऑफिस, त्यांची प्रायव्हेट पॉलिसी/ कंपनी पॉलिसी किंवा जर काही समस्या आली तर तक्रार कुठे आणि कशी करावी ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात नाही आणि मग सुरु होते फसवणूक. ऑर्डर केलेली वस्तू परत करून नाही मिळत, आलेल्या वस्तूची ग्रारेंटी वॉरेन्टी नसते, कधी कधी पैसे बँक अकाऊंट मधून जातात परंतु वस्तू येत नाही किंवा वेगळीच कमी प्रतीची वस्तू येते….जर कोणी उद्योजक अश्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तर्फे स्वतःचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकत असतील तर त्यांच्या हिशोबात घोळ आणि फसवणूक, बऱ्याच  वेळेला तर ती इ-कॉमर्स कंपनी अस्तित्वात नसते आणि पैश्याचा सायबर क्राईम सुरु होतो. असे बरेच घोटाळे आणि गुन्हे , ग्राहक संरक्षण कायदा आणि सायबर क्राईम अंतर्गत नोंदवले जातात. परंतु कायद्याचे विशेष ज्ञान नसल्यामुळे बहुतांशी ग्राहक किंवा व्यावसायिक न्याय मागायला जात नाहीत किंवा स्वतःला, उद्योगाला सुरक्षित ठेवत नाही. 

ई-कॉमर्स वेबसाइट वरून ऑर्डर करताना कोणती काळजी घ्यावी :

  1. कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटची संपूर्ण माहिती मिळवून मगच ऑर्डर करावी.

  2. .  ई-कॉमर्स वेबसाइटचे ऑफिस, कंपनीची प्रायव्हेट कायदेशीर पॉलिसि, त्यांचे संपर्क क्रमांक , ग्राहक तक्रार निवारण संपर्क (कस्टमर केअर नंबर ), डिस्प्युट रिसोल्युशन सेंटर क्रमांक, अशी संपूर्ण माहिती मिळवावी आणि कायदेशीर ई-कॉमर्स वेबसाइट वरूनच वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करावी.

  3. .  ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी साठी त्यांची सर्व माहिती कंपनीची प्रायव्हेट कायदेशीर पॉलिसि त्यांचे संपर्क क्रमांक , ग्राहक तक्रार निवारण संपर्क (कस्टमर केअर नंबर ), डिस्प्युट रिसोल्युशन सेंटर क्रमांक टाकणे अनिवार्य आहे त्यामुळे मार्केट नवीन आलेल्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सर्व माहिती पडताळून पहा.
  4. ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाईन लॉगिन करून पेमेंट करताना आपल्या बँकेच्या अकाऊंटची माहिती,  क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , UPI , मोबाईल वॉलेट(उदा फोन पे , गुगल पे ) , ई-मेल , मोबाइल ह्यांची माहिती (डेटा ) कधीही सेव करून ठेवू नका. ऑनलाईन लॉगिन करून शॉपिंग झाल्यावर लॉग ऑफ किंवा साइन करायला विसरू नका .

  5. अनोळखी sms किंवा ई-मेलच्या ऑफर लिंक वर क्लिक करू नका.

  6. आपले पासवर्ड दर महिन्याला बदलत रहा म्हणजे पैश्याचे घोटाळे (सायबर क्राईम) कमी होतात. कायदेशीर

  7. जर शॉपिंग नंतर  आलेली वस्तू नमूत केलेल्या दर्ज्याची नसेल किंवा ग्राहकाची फसवणूक झाली असेल तर ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो

ग्राहक तक्रार नोंद ही खालील वेबसाइट तसेच मोबाईल अँप्स द्वारा नोंदवली जाते.

A.  ग्राहक तक्रार नोंद वेबसाइट – https://consumerhelpline.gov.in/

B. ग्राहक तक्रार मोबाईल अँप्स-

a).NCH अँप्स- https://play.google.com/store/apps/details?id=mount.talent.mtcdev02.udaan

b).Consumer अँप्स – https://consumerhelpline.gov.in/apps/consumerapp/

c).UMANG अँप्स –https://consumerhelpline.gov.in/apps/umang/

C. ग्राहक तक्रार नोंद क्रमांक-  1800-11-4000 / 14404

D. SMS ग्राहक तक्रार नोंद क्रमांक – 8130009809

       8. ऑनलाईन पैश्याच्या बाबत काहीही गुन्हा   झाला असेल तर तुम्ही सायबर क्राईम सेलवर ऑनलाईन गुन्हे नोंदवू शकतात. ऑनलाईन सायबर गुन्हा नोंद वेबसाईट खालील प्रमाणे आहे.

ऑनलाईन सायबर गुन्हा नोंद वेबसाईट- https://cybercrime.gov.in/

ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी, ई-कॉमर्स वेबसाइट वरील व्यावसायिक आणि आय टी / सॉ फ्टवेअर कंपनीने वेबसाईट किंवा मोबाईल अँप्स बाबत कोणती काळजी घ्यावी :

  1. ग्राहक संरक्षण कायदा १९८६, मध्ये बदल करून नवीन ग्राहक संरक्षण  कायदा २०१९ आमलात  आला आहे, त्याप्रमाणे ई-कॉमर्स व्यवसायाबद्दल विशेष गाईड-लाईन नमूत केली  आहे, त्याप्रमाणे ई-कॉमर्स वेबसाइट कंपनीने स्वतः:च्या वेबसाइट किंवा मोबाइल अँप्स मध्ये नवीन ग्राहक संरक्षण  कायदा, २०१९ प्रमाणे  हवा असलेला कायदेशीर बदल करून घ्यावेत. अन्यथा ग्राहक संरक्षण  कायदा, २०१९ प्रमाणे  ग्राहकांच्या फसवणूकीच्या तक्रार आल्या तर कडक कारवाई आणि दंड  ह्यांना सामोरे जावे लागेल.
  2. आय टी / सॉफ्टवेअर कंपनीने वेबसाईट किंवा मोबाईल अँप्स बनवताना  ग्राहक संरक्षण  कायदा २०१९,   आय टी कायदा २०००, नवीन कॉपी प्रोटेक्टशन कायदा २०१३ आणि पुढील नियम २०१६ प्रमाणे , पर्सनल डेटा प्रोटेक्टशन कायदा २०१९ प्रमाणे वेबसाईट किंवा मोबाईल अँप्स बनवावे किंवा ई-कॉमर्स कंपनीला संपूर्ण माहिती द्यावी आणि मगच  वेबसाईट किंवा मोबाईल अँप्स बनवावी.
  3. जे व्यावसायिक, ई-कॉमर्स वेबसाइटवर आपले वस्तू (प्रॉडक्ट ) किंवा सेवा (सर्विस) त्यांनीही विकतात त्यांनीही  ग्राहक संरक्षण  कायदा २०१९,   आय टी कायदा २०००, नवीन कॉपी प्रोटेक्टशन कायदा २०१३ आणि पुढील नियम २०१६ प्रमाणे , पर्सनल डेटा प्रोटेक्टशन कायदा २०१९ ह्या कायद्यांची माहिती घ्यावी आणि योग्य अश्या कायदेशीर ईकंपनीची -कॉमर्स वेबसाइट निवड करून योग्य असे अग्रीमेंट करून घ्यावे.
  4. ई-कॉमर्स वेबसाइट कंपनने कोणतीही वस्तू (प्रॉडक्ट) किंवा सेवा (सर्विस) टाकताना व्यावसायिकाची आणि त्याच्या  वस्तू (प्रॉडक्ट ) किंवा सेवेची  (सर्विस) संपूर्ण माहिती मागवून घ्यावी आणि ती माहिती खरी आणि शाश्वत आहे ह्याची खात्री करून घ्यावी  आणि  त्यांच्या सोबत रीतसर अग्रीमेंट करून घ्यावे. जेणे करून ग्राहकांची  हेळसांड होणार नाही.

 

सध्या  सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे ग्राहक किंवा व्यावसायिक अगदी सहज विनामूल्य आणि वकीला शिवाय ग्राहक तक्रार करू शकतो. थोडीशी सतर्कता ग्राहकाचे आणि व्यावसायिकाचे नुकसान वाचवू शकते आणि ई-कॉमर्स व्यवसा होणाऱ्या फसवणूकीला आळा आणू शकते. कायद्याचे पालन करा म्हणजे तुम्ही आणि तुमच्या निगडित असलेले व्यवसाय सुरक्षित राहतील. 

By

Adv. Shivangi Zarkar

Founder of Law Fleeter Adv.Shivangi

Mob. No- +91 8850373717

Email – adv.dr.shivangi@gmail.com

Url – https://www.advshivangi.com

एम एस एम ई समाधान आणि फायदे

आपल्या देशात एम एस एम ई उद्योगांना, उद्योग विकासाचा कणा मानला जातो आणि ह्याच औद्योगिक कण्याला कायदेशीर रित्या लवचिक ठेवून, उद्योगांच्या आर्थिक व्यवहार आणि त्या संबंधित शंकांच्या निरसनासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे ‘एम एस एम ई समाधान’. एम एस एम ई क्षेत्र ही संधी आहे सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना जेणे करून हे उद्योग,

Recent Posts

Subscribe to our Newsletter

Our newsletter today for the latest updates, insights, and exclusive content straight to your inbox! Don’t miss out, sign up now!

Copyright © 2024 Vakilinbai

Managed by Web Creators India